श्रीकांतजी, एका सुरस विवादास तोंड फोडल्याखातर धन्यवाद!
चुकीची गोष्ट करतांना लहान मुलांना जे औत्सुक्य, जी भीती वाटावी ती तुमच्या कल्पनेत दिसून येते.
पथ्य का पाळायचे हे नीट न कळल्यामुळे असे होणे साहजिकच आहे.
ते समजून घेतल्यास संयम पाळणे मनाला शिकवावे लागत नाही मनच तुम्हाला संयम पाळायला लावते.
माझ्या अँजिओप्लास्टीनंतर मी अशाच परिस्थितीतून गेलो असता कसा उपाय गवसला, त्याची समग्र कहाणी
इथे मनोगतावरच नोंदवून ठेवलेली आहे. ती वाचा. ही विनंती. मग संयम पाळण्याचे सोंग घ्यावेसेच वाटणार नाही.

दुवा क्र. १: हृदयविकार

मग काय पक्वान्ने झोडायला परवानगी ना? >> नाही. मुळीच नाही.

मिलिंद, अन्नाची नासाडी होईल हे आपले म्हणणे खरेच आहे.

आजानुकर्ण, उलटी केल्यानेही नासाडीच होते. अर्थात, आपण संयम करावा यावर सहमत आहातच.

मीसुची, "देव करो अन अशी वेळ न येवो" या श्रीकांत यांच्याच उद्गारांवर जरा विचार करा. आपले विचार योग्यच आहेत.

मृगनयना, आपल्याला अनावश्यक वाटणारी कृती केवळ इतर सांगतात म्हणून मानण्यास माणसे तयार नसतात. त्यामागची कारणमिमांसा समजताच ते कृतीस सिद्ध होऊ शकतात. विरोध करत नाहीत. निर्भत्सना हा एक उपाय आहे. मात्र तो कायमच उपयोगी ठरेल असा सामर्थ्यवान नाही.

धीरज, नास झालेल्या अन्नाचे काय करावे याचा विचार करून तुम्ही चर्चेला इतरत्र नेत आहात. तसे करू नका.

संजय, तुमचा सल्ला मोलाचा आहे. योग्य तोच आहे. इष्ट तोच आहे.

मी तुम्हाला ग्वाही देतो तुम्ही अत्यंत अनावर भूक लागल्यावर खा. भूक हा निसर्गाचा निर्देशक आहे. ती भूकच तुम्हाला काय खावे आणि किती खावे हे सांगेल. तुमच्या शरीराला काहीही अपाय होणार नाही. तुमचे वजन योग्य राहील. तुमचे प्रत्येक भोजन हा उत्सव आणि कृतज्ञता होईल. तुम्हाला प्रत्येक जेवणातून तृप्ती मिळेल आणि अन्नाला ब्रह्म का म्हटले आहे ते कळेल. >> अगदी खरे आहे! सत्यवचन!!

विजयराव,
एक उपप्रश्न :- वमन रोज करणे योग्य आहे का? का करावे आणि कोणी? त्याचे काही अपाय आहे का? त्याला वेळेचे बंधन आहे का? उदा. सकाळीच करावे (की पहाटे)>>

वमन ही शरीर प्रकृतीच्या विपरीत ठरणारी शुद्धीक्रिया आहे. सामान्य माणसाने, सामान्यतः करूच नये. वमनाची पाळीच येऊ न देणे इष्ट. वमन, आयुर्वेदात निष्णात वैद्याच्या मार्गदर्शनाखाली करावयाचा क्लिष्ट उपाय आहे. जाता, येता करू नये.

कोलबेर, जे आपल्याला 'किळसवाणे' वाटत नाही आहे, ते 'हॅम्लेट' यांना वाटते आहे. सर्वसामान्य भारतीय ते किळसवाणेच समजेल.