ट. यांस,
आपण महाराष्ट्रातील कोणत्या शहरात रहाता?
विशय काय आहे हे आधि तुम्ही समजून घ्यायला हवे. दोन अत्यंत तोकडे मुद्दे समोर ठेवून मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही हे सांगण्याचा आटापिटा केलेला आहे. 'मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही' हे कोणी ही कबूल करेल. परंतु मुद्धे मांडताना 'मुंबई महाराष्ट्राची 'राजधानी' आहे हे त्यांनी लक्षात न घेताच, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले लोकप्रतिनिधी विधानसभेमार्फत महाराष्ट्र राज्य चालवतात. हे सरळ सरळ विसरून " मला ही परिस्थिती एक चिंतेची बाब यासाठी वाटते कारण यातून महाराष्ट्राबाबतचे सर्व निर्णय मुंबईवरून करण्याची एक प्रथा पडण्याची शक्यता आहे." असं जे विधान भूषण करतात त्याला काय म्हणायचे?
त्याने काहीही सिद्ध होत नाही. नाही म्हणजे, तो उपक्रम स्तुत्य असेलही (किंवा नसेलही), मला त्या उपक्रमाबद्दल काहीच कल्पना नसल्याने त्याबद्दल मी कोणत्याही बाजूने बोलू शकत किंवा इच्छीत नाही, परंतु आपल्या विधानाने तो उपक्रम स्तुत्य असण्याला पुष्टी मिळत नाही.
तुम्हाला त्या उपक्रमाची माहीती नव्हती तरीही तुम्ही त्यावर बरेच लिखाण कसे केले? व ते कशासाठी? ज्याची माहीतीच नाही त्याबद्दल जास्त लिहून तुम्हाला काय सांगायचे होते?
http://www.marathiasmita.org/ ह्या संकेतस्थळावर त्याबद्दलची माहीती दिली आहे.
एखादी व्यक्ती काही मोठं काम करू पाहत असेल तर त्यावर विश्वास ठेवता यायला हवा. (भूशण साहेब 'ह्या देशात कोण चांगला नेता आहे?' असा 'चोखंदळ' विचार करीत मागच्या दहा वर्षापासून निवडणूकीत मतदान करीत नाहीत.)
मी समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून त्यावर 'विश्वास ठेवायचा' की 'त्याला लाथाडायचे' असा विचार करणारा आहे. मी 'कौशल इनामदार' ह्यांच्या आव्हानावर विश्वास ठेवून त्यांच्या स्वप्नपूर्ततेला मदत केलेली आहे. हे मला तिथे सांगायचे होते.
(व्यक्तिगत संदर्भ व/वा विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. अधिक माहितीसाठी वाचा : सुसंबद्ध आणि सार्वजनिक स्वरूपाचे लेखन : प्रशासक)