एक तयार जमीन घ्यायची, गजल असली तर तेच काफिया-रदीफ़ घेऊन त्यात अत्यंत आचरट असे विषय, जसे अनैतिक संबध, नशापान, अवयवांचे वर्णन वगैरे करायचे ( पोट फार सुटले वगैरे ) अन पालकांनी ठेवलेल्या आपल्या नावाचेही विडंबन करून ती उल्हासनगरी रचना विडंबन म्हणून प्रकाशित करून टाकायची.
या सर्वामुळे हीन अभिरुची तयार होणार यात शंका नाही.
वाचकही कविता आली की विडंबन कधी येते अन 'हा हा हा' असा प्रतिसाद कधी लिहिता येतो याची वाट बघत बसणार!
जयंतरावांनी जे विधान केले आहे की एक तास तरी थांबायचे, यातील क्लेष हा अभिरुची घसरल्यामुळे चांगल्या कवितेला वाव मिळण्याची शक्यता घटते या भावनेतून आला असावा अशी माझी खात्री आहे. पण त्यांच्या त्या म्हणण्यालाच करमणुकजनक प्रतिसाद समजले गेले आहे.
( खिल्ली उडवली जाणे हे मनोरंजन-जनक असल्यामुळे साहजिकच विनोदी विडंबनांकडे मूळ कवितेपेक्षा जास्त आत्मीयतेने पाहिले जाणार, कारण करमणुक होणे ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. )
बाकी सर्व मनोगतींची इच्छा!
( हे मत मी एखादे विडंबन वाचून करत नसून जवळ जवळ २० विडंबने वाचून व्यक्त करत आहे. )
( बाय द वे - असली विडंबने करायची झाली तर 'सध्या विडंबने न करणाऱ्या कवींना' रोज प्रकाशित होणाऱ्या सर्व कवितांचे त्याच दिवशी विडंबन करून प्रकाशित करणे शक्य होईल. )
अपेक्षा - विडंबन जरूर करावे, पण त्यातून सामाजिक जाणीव प्रामुख्याने दिसावी व कुठेही मूळ कवितेला किंवा कवीला दुखवू शकेल असे लिखाण नसावे, असे माझे विडंबनाबाबत मत आहे. हे मत मी शक्य असेल तितक्या वेळा शक्य असेल तेथे व्यक्त करत राहणारच!
(काही भाग वगळला. अधिक माहितीसाठी वाचा - सुसंबद्ध आणि सार्वजनिक स्वरूपाचे लेखन : प्रशासक)