मी सतीश रावले, श्री. गांगल यांच्या लिपीत सुधारणा होणं, फॉंट मध्ये, त्यासंबंधित तंत्रामध्ये प्रमाणीकरण ह्या उद्देशाने केल्याल्या कृतींना समर्थन देत आहे.

याच सह त्यांनी ही 'गांगल' ह्या नावास ब्रँडीग करण्यावरचा जोर वा अट्टाहास सोडून द्यावा ही विनंती ही करीत आहे. आपलं नाव आजरामर व्हावं ही अनेकांची इच्छा असते. परंतु ती एखादे चांगले व भव्य काम पूर्ण करून ही होऊ शकते. त्यासाठी नावाचे ब्रँडींग करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी एखादी संघटना स्थापन करावी, व त्या संघटनेच्या माध्यमातून आपले पुढील बेत आखावेत व त्यांना अमलात आणण्याचा प्रयत्न करावा.

जर समाजासाठी आपण काही करीत आहात तर समाजाचा सहभाग मिळवण्यासाठी एक संस्था ही हवीच.

-----

मनोगत च्या सभासदांसाठी,

आपण नेमका विरोध कशासाठी करीत आहोत हे पहीले जाणून घ्यावे. मी श्री. गांगल यांचा मित्र ही नाही नातेवाईक ही नाही. परंतु येवू घातलेल्या बदलाला तयार असावे या मताचा आहे. आणि हो!, 'युनिकोड' हे तंत्रज्ञान जगातील अंतिम तंत्रज्ञान नाही, ह्या विचाराचा मी आहे. 'युनिकोड' ह्या तंत्राच्या पुढे ही नवे तंत्रज्ञान विकसित होण्यास जागा आहे. ह्या चर्चेत माझा हा शेवटचा प्रतिसाद व्यक्त करून मी आपणास तयारी उद्याच्या मराठीची  हा लेख वाचावा अशी विनंती करतो.