वा! कविता चांगली, प्रभावी झाली आहे. गणगोत, स्रोत, लाखोत विशेष.

हा विषय जयंतराव म्हणतात त्याप्रमाणे अस्पर्शितच आहे.भूतखेते, मुंज अन् हडळींवर फारशा गंभीर कविता माझ्या वाचनात आलेल्या नाहीत. आल्या असतीलही पण कदाचित मीच त्यांना गंभीरपणे घेतले नसावे. त्यामुळेच कविता वाचताना एकीकडे भयानक हसूही येत होते. कारण अदिती ह्यांची पिंगा ही कविता आणि केशवसुमार ह्यांनी त्याभवती घातलेला पिंगा -२ आठवला.