हि गोष्ट रा. स्व. संघाचे गुरुजी गोळवलकरानी सांगितली आहे.
हजरत पैगंबर जेव्हा म्हातारे झाले होते तेव्हा त्याना एका टोळियुद्धाची बातमी समजली. दोन टोळ्यान्मध्ये घमासान लढाई सुरू झाली आहे आणि कोणिही माघार घेण्यास तयार नाही. तेव्हा त्यानी दोन्ही टोळ्याच्या प्रतिनिधिना भेटण्यास बोलाविले. तेव्हा ते समजावून सांगू लागले कि आता थांबा हा हिन्साचार त्यावर उपाय म्हणून पैगंबरानी असे सुचविले कि दोन्ही टोळ्यानी मिळून एक उमराव निवडावा आणि त्याला हजरत पैगंबरांचा प्रतिनिधी म्हणून मान द्यावा आणि त्याच्याशी सल्ला मसलत करून काम पुढे चालेल; पण दोन्ही टोळ्यांचे प्रतिनिधी म्हणाले कि, "युद्धाचे मूळ कारणच हे आहे कि उमराव कोण बनेल" यावर हजरत पैगंबरांचे उत्तर हे -
उमराव अश्याला बनवावे ज्याला उमराव बनण्याची इच्छाच नाही. ज्याला उपनिषदान्मध्ये अकाम: असे म्हणले आहे.
आता काय करावे नि कसे करावे मोठा गहन प्रश्न आहे.