व्यायाम तर मी ही चालू केला होता, आणि जालावरील शोधसुद्धा... पण माझ्या शोधानुसार किंवा अनुभवानुसार म्हणा, एकाला जो व्यायाम जमेल (किंवा करावा असे म्हणतात) तसा सगळ्यांनाच चालेल असं नाही.

दुसरं म्हणजे तुमचं वजन आणि पोट कमी आहे की जास्त हे आधी महत्त्वाचं. वजन कमी असेल तर आधी ते वाढवा आणि मगच ६ पॅक कडे लक्ष द्या. वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर सुरुवातीपासून धावू नका. आधी वजन कमी होवू द्या मगच धावायला सुरुवात करा.

अंदाजे ३० मिनिट चालणे (रोज), एका दिवशी शरीराच्या वरच्या भागाचा (पोट, छाती, हात, वगैरे) तर दुसऱ्या दिवशी खालच्या भागाचा (पाय, कंबर, इ. ).

महत्त्वाचे :- कुठलेही प्रथिने रोजच्या पदार्थातूनच मिळवा, उगाच अनावश्यक गोळ्या वा पावडर घेऊ नका, त्याचे पुढे वाईट परिणाम संभवतात.

रोजचे जेवण सुरुवातीलाच वाढवू नका, किमान महिना, दोन महिने तरी भूक वाढत नाही. अंदाजे ३ महिने तरी तुमच्या शरीराला सवय व्हायला लागते, त्यामुळे जास्त प्रथिने व कमी कार्बोदके, वगैरे प्रकार करू नका. ते सगळं ३ महिन्यांनंतर (ते स्वतःचे स्वतःलाच बरोबर कळते).

आणि अतिमहत्त्वाचे :- संयम ठेवा. रोजचा ९० मिनिटे व्यायाम करणाऱ्याला किमान १ वर्ष लागू शकते, तेव्हा घाई नको. वजनांकरिता :- खूप कमी नाही आणि खूप जास्त नाही. (हे एकूणच व्यायामासाठी म्हणता येईल).

अधिक माहितीकरिता :- वाचा दुवा क्र. १ आणि दुवा क्र. २ मनोगतावरील चर्चा.

अवांतर :- मनोगतावर शुद्धिचिकित्सक आहे. लिहिताना या खिडकीतील वरच्या बाजूस "गमभ" दिसेल तिथे टिचकी मारा, म्हणजे शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त होतील.