वजन कमी होत नाही?

वजन कमी होत नसेल किंवा वजन आहे त्यापेक्षा वाढू नये याकरता आपण काय करू शकतो? आम्ही एका पुस्तकाच्या आधाराने  प्रयोग केले त्यानुसार फायदा होत आहे.


१. सकाळ व संध्याकाळ चहातून फक्त १ चमचा साखर घेणे.
२. उकडलेला भात एकदाच अर्धी वाटी खाणे.
३. कणीक भिजवताना तेल न घालणे.
४. भाजी करताना टीस्पूनने मोजून तेल घालणे.
५. कोक-कूकीज-चॉकलेट पूर्णपणे बंद करणे.
६. बटाटा चीप्स पूर्णपणे बंद करणे.
७. सर्व मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाण्याचे बंद करणे.
८. डाळी-उसळी खाणे.
९. उकडलेल्या अंड्यातील फक्त पांढरा बलक खाणे.
१० दिवसातून फक्त २ पोळ्या खाणे.
११ बाहेरचे खाणे महिन्यातून एकदा


तुम्हांला काही सुचत आहे का?


रोहिणी