१. शिकवण्या बंद कराव्या. शिकवणीने अभ्यास होण्याऐवजी वेळ वाया जातो. खरं तर शाळेत शिकवल्या जाते त्याकडे लक्ष दिले, आणि पालकांनी थोडंसं मार्गदर्शन केलं तर शिकवणीच्या जाचातून सुटका होईल. सकाळी ६ ते सायंकाळी ६ पाल्य जर नुसताच अभ्यास एके अभ्यास करत असेल तर काय होईल ?

शिकवण्या बंद झाल्या तर पाल्य शाळेत लक्ष देईल आणि शिकवणीचा वेळ इतर त्याच्या छंदासाठी देता येईल. या वेळात त्याला उगाच अभ्यासाला बसवू नये.

ता. क. :- गुणवत्ता यादीत येणाऱ्या किती विद्यार्थ्यांची नावे आपल्याला ठाऊक आहे ? त्यांनी जीवनात पुढे काय केले ? त्यासाठी गुणवत्ता यादीच आलेत पाहिजे का ?

२. शाळेत शिकवल्या जात नसेल तर तो पालकाचा हक्क आहे की त्याने तशी शाळेकडे तक्रार करावी. त्यासाठी पालकांचा समूह (गट) बनवला तर अधिक उत्तम. आता इतकंही करणार नसेल तर खुशाल पाल्याचा बळी जाऊ द्यावा.

३.  मुलांना वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेण्यास उत्तेजन. ती स्पर्धा जिंकण्यासाठी नव्हे तर तिचा आनंद घेण्यासाठी. मला स्वतःला अश्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आवडते, भलेही बक्षीस न मिळो पण ते प्रश्न सोडवण्याचा आनंद काही औरच असतो.

अवांतर :- रंगिला चित्रपटातील आमिरच्या मित्राचं वाक्य, (गाल चोळत)  "कुछ भी हो, ट्राय तो किया ना बॉस... "

४. पाल्याचा रस कशात आहे, हे लक्षात घेऊन त्याला उत्तेजन देणे .... बघा

दुवा क्र. १ येथील श्री. संजय क्षीरसागर यांचा प्रतिसाद.

५. आणि पाल्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे.... अगदी भरपूर ........