पावभाजीच्या चवीत उकडलेल्या बटाट्याचे योगदान फार मोठे असते. उकडलेल्या बटाट्याची चव आणि शिळे वरण + परतलेला लसूण + फोडणीतील कढीलींब ह्यांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक पडेल. त्या साठी पाककृती करूनच पाहायला हवी असे नाही. तसेही, आपल्या पाककृतीला कोणी नांवे ठेवत नसून आपण आपल्या पाककृतीला जे नांव दिले आहे त्याला काही सदस्यांनी नापसंती दर्शविली आहे.

सर्वसामान्यपणे पावभाजीत ठेचलेला लसूण आणि कढीलिंब घालत नाहीत. तसेच, तेलाचा वापरही करीत नाहीत. असो.

माझी पावभाजीची कृती इथे वाचावयास मिळेल. माझी पाककृती सर्वोत्कष्ट आहे असा माझा दावा नाही परंतु आपणांस निश्चित आवडेल असा विश्वास आहे.

व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृती प्रकृतीत चवीचे संदर्भ बदलतात. आपली पाककृती कोणाला आवडली नाही म्हणून नाउमेद होऊ नये. माझी पाककृतीही आपणांस आवडली नाही तर तसे खुशाल सांगा.