कृतांत आणि कृतान्त मध्ये शुद्धलेखनाच्या नियमानुसार काही भेद नाही असे वाटते. मात्र अर्थ स्पष्ट होण्यासाठी न्त असा प्रयोग जास्त बरा वाटतो.
कृत म्हणजे केलेले असा अर्थ होतो. अंत म्हणजे शेवट.
त हा सप्तमीचा प्रत्यय आहे. कृतांत लिहिले असते तर केलेल्यांमध्ये आणि केलेल्याचा अंत (?) असे दोन्ही अर्थ व्हायची शक्यता होती.
ह्यासाठी अनुस्वार विचार ह्या लेखामधील नियम ४ पाहा.
चूभूद्याघ्या