ऑक्टोबर १२ २००४

अनुस्वार विचार

ङ्, ञ्, ण्, न्, म् यांना अनुनासिके म्हणतात.
१. स्पष्ट, उच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.

उदा : गुलकंद, चिंच, तंटा, निबंध

२. तत्सम शब्द अनुनासिके वापरूनही लिहितात. परंतु अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच वापरावे लागते.

उदा :

पंडित पण्डित
अंतर्गत अन्तर्गत

३. पण मराठीतील शब्द पर - सवर्ण अनुनासिक वापरून लिहू नयेत.

उदा :

दंगा दङ्गा लिहू नये.
तांबे ताम्बे लिहू नये.
खंत खन्त लिहू नये.

४. अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधी कधी पर - सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.

उदा :

वेदांत = वेदांमध्ये वेदान्त = तत्वज्ञान
देहांत = (अनेक)शरिरांत देहान्त = मृत्यू

५. काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये.

उदा :

हंसणे हसणे
धांवणे धावणे
जेव्हां जेव्हा
कोठें कोठे
कधीं कधी
कांही काही

६. य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह्, ज्ञ् यांच्या पूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.

उदा : सिंह, संयम, मांस, संज्ञा

नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.

उदा : 'पत्र' या शबदाला तृतीया विभक्तीचा प्रत्यय लावल्यास 'पत्राने' असे रूप होते. यातील 'पत्रा' हे सामान्यरूप असते.

७. नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामन्यरूपावर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.

उदा : लोकांना, तुम्हांस, मुलांनी, लोकांसमोर, घरांपुढे पुस्तकांवर, विभागांकडून, मुलांच्या.

८. शब्दाच्या एकवचनी सामान्यरूपावर अनुस्वार देऊ नये. आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही शब्दावर अनुस्वार द्यायला पाहिजे.

उदा : पंतप्रधानांचे भाषण, तुम्हांला, आपणांस

९. वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे अथवा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.

उदा : घरें, रूपें नामें पांच, नांव, कां, कांच, जेव्हां, तेव्हां अशा शब्दांत अनुस्वार देऊ नये.


 टीप : येथील मजकूर सुखदा ह्यानी मायबोली येथे लिहिलेल्या अनेक लेखांच्या आधारे त्यांच्या सहमतीने तयार केलेला आहे.

Post to Feedवैशिष्ठ्य म्हणावे की न
दुरितांचे?

Typing help hide