महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र वगैरे अनेक विषयांवरचे इंग्रजी-मराठी शब्दकोश आहेत. संपूर्ण यादी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आहे.
सत्त्वशीला सामंत यांनी संपादित केलेला शब्दानंद नावाचा, शब्दांची विषयवार वर्गवारी करून मांडणी केलेला व्यवहारकोश सर्वोत्तम आहे.
वरच्या प्रतिसादात 'सोहोनी' या नावाऐवजी 'अग्निहोत्री' वाचावे.
सरकारी कोशासाठी दुवा क्र. १ उघडावा. हा कोश आता पूर्ण झाला आहे आणि आंतरजालावर वाचायला मिळतो.
कृ. पां. कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्ति कोश श्रीपाद जोशी यांनी पुनःसंपादित करून त्याला पुरवणीही जोडली आहे; आता तो अधिक बरा झाला आहे.