अदितीच्या या लेखाची (आणि तिचीही) प्रकर्षाने आठवण येते. नुकतीच कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली. त्यानिमित्ताने तिच्या पौर्णिमा आणि आश्विन या कवितांचीही आठवण झाली. आपल्या अल्प आयुष्यातही सुगंधाने लोकांचे मन उल्हसित करणाऱ्या पारिजातकाच्या फुलांबद्दल ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे,
"जुनी नवी पारिजाते । आहाती काई॥"
तेच अदितीबद्दलही वाटते. तिचे लेखन चिरतरूण, सदा टवटवीत आहे.