ह्या दुव्यावर आपल्या माऊसचे टोक न्या. टोकाखाली येणाऱ्या छोट्या खिडकीत "मनोगत मुखपृष्ठ" असे दिसते. हे कसे काय?

इथे "एच टी एम एल" फेरफारात असे लिहिले आहे.
=======================================
<a title="मनोगत मुखपृष्ठ" href="http://www.manogat.com" target="_blank">ह्या दुव्यावर </a>

=======================================
या अधीचा माझा "दुवा अधिक माहिती" हा प्रतिसाद पाहा. तिथे दिलेल्या माहितीशिवाय इथे एका गोष्टीची भर आहे, "title". "title" च्या पुढे जे लिहाल ते लिखाण दुव्यावर माऊसचे टोक नेले असता दिसेल.

इथे नमुन्यादाखल एक दुवा देत आहे, 
========================================
<a title="या दुव्यावर माऊस नेल्यास ही माहिती दिसेल" href="http://www.manogat.com" target="_blank">नमुना दुवा</a>

========================================
असे "एच टी एम एल फेरफार" मध्ये लिहिल्यास "साध्या पानावर" खालीलप्रमाणे दिसेल.
नमुना दुवा
वरील दुव्यावर माऊसचे टोक नेऊन पाहा.

भोमेकाकांचे अलिकडच्या काळातील दुवे पाहा.

चला तर मग असे नवीन खिडकीत उघडणारे (आवश्यक असेल तेंव्हाच) आणि माऊसचे टोक दुव्यावर नेताच दुव्याविषयी माहिती देणारे दुवे द्या.

आपला,
(माहितीदाता) शशांक