अहो जयन्तराव,

मराठी जिभेला कांदा हवा...मग तो बुक्कीने फोडून पिठल्याबरोबर असो, उभा चिरून खेकडा भजी असो, कैरीच्या चटणीत असो, उभा-आडवा चिरून कांदाभजी असो, बारीक चिरून भेळ-पाणीपुरीत असो, पावभाजीत असो, साबुदाण्याच्या खिचडीत असो, खमंग थालीपिठात असो, धिरड्यात असो, आम्लेट मध्ये असो, घोळण्यात असो, कोशिंबिरीत असो, वांग्याचा भरीतात असो, परतून बटाट्याची भाजीत असो, पोह्यात असो, उपम्यात असो, मसाले भातात, शिजवून बटाट्याच्या रस्श्यात असो, त्याची पात खुड्यात असो, पीठ पेरून भाजीत असो.

पोळी, भाकरी किंवा पावाबरोबर खा!

उगाच नाही शिवरायांचे मावळे घोड्यावर दौड करताकरता कांदा-भाकर खाण्याच्या गोष्टी सांगोवांगी पसरल्या.

'कांदेपोह्यांना' मराठमोळ्या 'दाखवणे' कार्यक्रमात विशेष महत्त्व प्राप्त झाले ते याच कारणाने असावे.

'मोरूची मावशी' सुद्धा 'कांदा' संस्थान ची राणी आहे ते काय उगाच नाही!

चिरता चिरता डोळ्यात पाणी आणणारा हा कांदा अस्सल मराठमोळ्या तोंडाला तेव्हढ्याच हौसेने पाणी आणतो!