आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना साहाय्य करण्यास कोण विरोध करतो आहे. मनोगतावरही नाही आणि बाहेरही नाही. त्यामुळे वरील मुद्दा ह्या चर्चेत गैरलागू आहे.

 

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना विरोध करणारे मनोगती त्यालाही विरोध मध्ये मनोगतावरच मिळतील. त्याला सहमती दर्शविणारे ही आहेत (असा-मी शी सहमत). चर्चा संबंधित आहेच शिवाय यांचे मुद्दे लक्षात घेण्याजोगे देखील आहेत.

तो,

  आपण माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना साहाय्य करण्यास मी कधीच विरोध दर्शविला नव्हता. मी फक्त आरक्षणाला विरोध दर्शविला होता. माझ्या प्रतिसादात मी असे स्पष्ट नमूद केले आहे की भोमेकाकांच्या मतांशी (शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण, सुलभ कर्ज ई. ई. हे तेंव्हा नमूद केले नव्हते) मी सहमत आहे.

आरक्षणाला विरोध याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना विरोध असे 'तो' समजतो याची 'मी' ला कल्पना नव्हती.

माझा विरोध कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला आहे. साहाय्याला नव्हता आणी असणार नाही.

आणी हे तर आपण ही मान्य कराल की आज जे आरक्षण लागू केले आहे; ते फक्त मतपेटीवर डोळा ठेवून; मग उगाचच आपल्यासारखा हुशार (हे विशेषण आदराने वापरली आहे)माणूस त्याचे समर्थन का करीत आहे. हे मला कळत नाही आहे. 

प्रमोग महाजन जेंव्हा अत्यवस्थ होते नि इथे मनोगती प्रार्थना करण्यात रममाण होते तेंव्हा त्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी कुणाला पाचारण करण्यात आले याची गंभीर चर्चा करणाऱ्या व तितक्याच उत्साहाने सुचवण्या करणाऱ्यांना कल्पना आहे काय?

त्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी ज्यांना पाचारण करण्यात आले होते, त्यांनीही आरक्षणाला विरोध केला आहे असे मध्ये वाचनात आले होते. याकडे तो चे दुर्लक्ष होणे यापेक्षा नवल ते काय.

असा-मी