सातीताई,

संभाषण किंवा लेखनशैली भाषणासारखी असल्यास 'होते'चे 'होतं' करावे.

नियम असा आहे -

लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे.
उदाहरणार्थ: असं केलं; मी म्हटलं, त्यांनी सांगितलं.

अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत.
उदाहरणार्थ: असे केले; मी म्हटले; त्यांनी सांगितले

म्हणूनच ललित लेखनात, कथा किंवा तत्सम स्फुट लेखनांत 'होतं', 'गेलं', 'झालं', 'करायचं' असा वापर आढळतो. पण इतरत्र असा वापर करू नये. (वृत्तपत्रातली, शासकीय कामकाजातली, भौतिकशास्त्राच्या पुस्तकातली भाषा अशी नसते.)


चित्तरंजन