अदिती, आम्हाला हा भाग वाचून जे मनापासून सांगावेसे वाटले ते आम्ही सांगितले आहे.  बोलीभाषेच्या दृष्टीने आम्हाला गुंतागुंतीचा.. पर्याय अधिक योग्य वाटला, हा बोलीभाषेतला आणि आपल्या विचारसरणीतला फरक असावा असे म्हणू.  

योग्य का अयोग्य याचा निर्णय आपण करा.  आपल्या खुलास्यासाठी आभारी आहोत.

प्रचीती- कित्येक दिवस आम्हालाही आपण दिले त्यानुसार प्रचिती हा शब्द बरोबर आहे असे वाटायचे ; कारण ह्या शब्दाचा उगम वेगळा आहे.

प्रचीत - अनुभव, खात्री,प्रत्यंतर, विश्वास. त्यावरून होणारा शब्द प्रचीती. मराठी शब्दकोशात हा शब्द दीर्घ आहे.

आपल्या खात्रीसाठी मनोगतावरील हा दुवा  पहा.