हा सगळा समाजातील इतर लोकांचा दोष की त्यांनी या लोकांच्या भोवती अशा रंजक कथा / चमत्कार गुंफ़लेत...
सचिनराव,
आपल्या म्हणण्या प्रमाणे संतांनी समाजकार्य, तत्त्वज्ञातील ग्रंथरचना इत्यादी लोकोपयोगी कर्ये केली हे बरोबरच आहे. पण त्यांनी चमत्कार केले (किंवा त्यांच्या जीवनात विज्ञानाच्या परिभाषेत समजायला अवघड अशा घटना घडल्या) हेच आपल्याला (आणि विज्ञानवादी लोकांना) मान्य नाही असे दिसते. मी मागे अध्यात्म आणि अद्भुत अनुभवांचे जग. या चर्चा प्रस्तावामध्ये हेच जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता की, आज सर्व सुशिक्षित तसेच अभ्यासू आणि विद्वान यांच्यामध्ये आदरणीय, अशा काही लोकोत्तर पुरुषांच्या चरित्रांमध्ये अशा अद्भुत घटनांचे दाखले मिळतात. आता हे दाखले काही त्या लोकांनंतर स्वतःला भक्त म्हणवणाऱ्यांकडून लिहिले गेले नसून या पुरुषांनी स्वतःच भाषणांतून, लेखनातून सांगून ठेवलेले दिसतात. असे असताना आपण जर त्या घटना हे थोथांड आहे असे म्हटले तर त्या लोकांच्या तत्त्वज्ञानाचा फेरविचार करायला लागेल. याविषयी आपले आणि इतर विज्ञाननिष्ठ मनोगतींचे विचार जाणून घ्यायची इच्छा आहे.
आपला,
--लिखाळ.