१ व २) क्रमांक एक व दोन चे उत्तर त"ज्ञ"च देऊ शकतील. "क्ष"मा करा.
३) कळफलकांचे प्रमाणीकरण ही मागणी तशी जुनीच असून ती बहुधा पूर्ण होईल असे वाटते आहे.
४) "त्या" संकेत स्थळावरील सुविधा उत्तम आहे पण त्याचा उपयोग मर्यादित आहे.
५) मला लिहायचे आहे ते आपण मांडलेल्या पाचव्या मुद्द्याबाबत.
>> मला अशात श्रीलिपी , आयलिप या दोन्हीचे युनिकोडीकरण करून हवे होते ,
>> तसेच महाराष्ट्र शासनाचे संकेत स्थळाचे मराठीचे पण युनिकोडीकरण कुणी करू शकेल तर छान होईल.
विविध अशास्त्रीय (प्रोप्रायटरी या शब्दाचे अघटित भाषांतर) फॉन्टचे युनिकोडीकरण ही समस्या टी.सी.एस. च्या "स्वेच्छा" टीमने म्हणजे विघ्नेश यांनी अशारीतीने सोडविली आहे की मला आश्चर्याचा धक्काच (सौम्य) बसला आहे.
पी एच पी ही प्रोग्रॅमिंग भाषा वापरून जर कोणी गिरगिट ही सुविधा वरीलप्रमाणे ऑनलाईन उपलब्ध करून दिली तर ते अत्यंत उपयोगी असे कार्य होईल. म्हणजे गुजराती युनिकोडित मजकूर आपण देवनागरीत सहजगत्या वाचू शकू. ज्यांना गुजराती समजते पण लिपी वाचता येत नाही त्यांना आजचा ऑनलाईन गुजरात समाचार देवनागरीत वाचता येईल. उदा. आजच्या पेपरातील ही बातमी अशी दिसेल आपल्या स्र्कीनवर
http://www.gujaratsamachar.com/gsa/20061225/guj/gujarat/news3.html
प्रेमी युगलनुं अपहरण करी कार सहित ४.१७ लाखनी लूंट
गुजराती लिपी न येणाऱ्यालाही हे वाचता येईल की नाही? अशाच प्रकारे गुजराती माणूस देवनागरी वाचू शकेल त्याच्या रोजच्या लिपीत.
गिरगिट सुविधा येथे उपलब्ध आहे.
http://devanaagarii.net/hi/girgit/
हा प्रतिसाद मी मराठी वर्ड प्रोसेसर (ओपन ऑफिसचा रायटर) आपल्या संगणकावर स्थापित करून बराहाच्या मदतीने टाईप केला आहे. अधिक माहिती येथे पाहा.
http://www.manogat.com/node/8130