प्रस्तुत लेखकाचे संशोधन आणि लेखन/त्यावरील कष्ट हे समजून घेऊन आणि आदर राखून खालील लिहावेसे वाटते:

प्रियाली यांनी वर "या आधी"  दिलेल्या प्रतिसादातील डॉ. प.वि.वर्तक यांनी या विषयावर आधी लिहील्याचे चांगले वाचनात आहे. त्यांची भीमावरील "स्वयंभू" आणि रामायणावरील "वास्तव रामायण" ही पुस्तके चाळल्यास लक्षात येईल. कुठलेही लिखाण हे शास्त्रीय संदर्भात करताना आधीच्या संशोधनाचा संदर्भ दिलेतर बरे होते. शिवाय एखादी गोष्ट "शोधून" काढली म्हणताना  ते संशोधन कोणी मान्य केले हे बघणे महत्त्वाचे असते. एका व्यक्तीचा यात संदर्भ देणे बरोबर नाही असे वाटते. शिवाय हे काम "संशोधन" म्हणून प्रकाशीत झाले आहे का हे पण सांगीतले तर त्याचा उपयोग कायमस्वरूपी साऱ्या जगाला सांगायला होऊ शकतो.

रामायण-महाभारत काल हा असा विषय आहे की ज्यावर अनेकांनी अनेक वेळेस लिहीले असेल. वर्तक हे त्यातील माहीती असलेले लेखक. माझ्याकडे त्यांचे पुस्तक आत्त्त आत्ता नाही, पण त्यांचे वाचल्यावर जे काही समजले/आठवते ते थोडक्यात असे (त्यांचे सगळे विचार पटण्यासारखे नाहीत, पण ह्याचे स्पष्टीकरण नक्की भावले आहे) महाभारतपुरते लिहीत आहे:

महाभारत लिहीण्याबाबतची गोष्ट अशी आहे की व्यासांनी केलेल्या विनंतीला मान देऊन गणपती लेखनीक होण्यास तयार झाला, पण अट घातली की तो लेखणी खाली ठेवणार नाही. अर्थात व्यासांनी न थांबता सांगायचे.  व्यासांनी त्यावर उलटी अट घातली की गणपतीनी न समजून घेता लिहायचे नाही. दोघांनी आपापल्या अटी मान्य केल्या. व्यासांनी विचार करायला लागणाऱ्या वेळेत गणपतीला व्यस्त ठेवण्यासाठी क्लुप्ती लढवली आणि त्यात खगोलशास्त्रीय कोडी घातली जी सोडवायला गणपतीला वेळ लागत असे. त्या वेळेत व्यास पुढील लिखाणावर विचार करत...

महाभारतातील सर्व संदर्भ हे खगोलशास्त्रीय आहेत. त्यातील ध्रूव तारा, सप्तर्षींची ठेवण इत्यादीवरून विचार केल्यास खगोलशास्त्राचा संदर्भ देऊन कालनिर्णय करता येतो.