काहि नवे परदेशस्थ मराठी शब्द...

काही नवे परदेशस्थ मराठी शब्द...
अमेरिकेतील प्रवास, या श्री. रवी यांच्या लेखना वरील प्रणाली यांचा प्रतिसाद वाचून सहज एक कल्पना सुचली, की आपल्या पैकी काही जण परदेशस्थ (परदेशी-स्थायिक झालेले/असलेले  ) मराठी मनोगती आहेत, त्यातील बरेच जण प्रतिभावंत पण आहेत, आणि अश्या या मनोगतींचा एखादा अनोखा वयैक्तिक असा शब्दकोश हि असेल. कारण परदेशात, किंवा परराज्यात सुद्धा मुख्यत्वे जिथे मराठी ही सामान्य बोलीभाषा नाही तिथे, आपल्या-आपल्या मराठी चमू मध्ये आपण एखादा स्थानिक भाषेतला शब्द विडंबात्मक पद्धतीने वापरतो, आणि तो तिथे इतका चपखल बसून जातो की, मूळ मराठी भाषेतील शब्दा प्रमाणे आपण तो वापरात आणतो अर्थात विनोदानेच...
तर मग अश्या शब्दांचा एक संच केला तर? आम्ही वापरत असलेले काही शब्द इथे देत आहे.
फ़ॉरेनर आणि फ़ॉरेनारी
इंग्रजाळलेले (भारतीय) लोक
हिंदाळलेले (इंग्रज वगैरे...)
पऱ्या , गंधर्व  आणि त्यांची प्रार्थना-स्थळे/तीर्थ क्षेत्रे (विक-एंड ला मद्यालयातुन स्वैर उडणारे अबाल/तरुण-तरुणी)
प्रणाली यांनी सुचवलेला - अम्रु = (अमेरिकन)
आमचा चेन्नै मधला आवडता शब्द - "सापडले का?" = (सापड=) जेवला का?
आमचा बंगरुळु मधला आवडता शब्द - "इंजोय माडी" (हा तसा नविन नाही).
अजून बरेच आहेत, सुचले की उप-लोड करेनच...
(अशी वाढते भाषा - अश्या परदेशी-मराठीचा नवा कोश - संकल्पना कशी वाटतेय?)