तुझी आठवण

तेंव्हा...

दिडदा सतार

बाळाचं जावळ

रविवर्म्याचं चित्र

खडीसाखर

अत्तराचा फाया

आता...

ओरखडे काचेवर

तापलेला तवा

गटारातलं डुक्कर

पाटणकर काढा

धोतऱ्याचं  फूल

...तुझी आठवण!