कांही वर्षांपूर्वी टाईम्स मधे एक बातमी आली होती की एका श्रीमंत घरांत Income Tax ची धाड पडल्यावर घरांतल्या प्रमुख बाईने त्यांच्यासमोरच आपले कपडे काढायला सुरवात केली. त्यामुळे गोंधळून जाऊन ते पथक पळुन गेले. स्त्री कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन परत येईपर्यंत घरांतल्या सर्व बेहिशोबी वस्तुंची विल्हेवाट लावण्यात आली. त्यावर सुचलेली ही कविता!
करवसुलीचे पथक पाहता
रचिला ललने डाव कोणता
वस्त्रबंधने विमुक्त होता
'करवीर' घेती पाय काढता
लक्ष्मणरेषा कसली पुसता
नंगेसे तो खुदा भी डरता ॥