मराठी का डेंजर आहे?

मित्रांनो,

      मी अमेरिकेमधे येउन आता २ पेक्षा जास्त महिने झाले. एवढ्या दिवसांमधे मी खूप उंडारलो. इतरांची मदत घेउन इथली भाषा आणि वागण्याच्या तऱ्हा उचलल्या आणि त्या बोलताही यायला लागल्या आहेत. तर एक निरीक्षण.. कृपया तुम्हाला या विषयी काय वाटतं मला ऐकायला भयंकर आवडेल.... जरी मला इंग्रजी मधे धाडधाड बोलता येत असलं तरी जेव्हा काहीही जोषात बोलायचं असलं कि मराठी स्लँग ची प्रकर्षानं आठवण येते. इथे इंग्रजी मधे झालेल्या मराठी किंवा इतर कुठल्या भेसळीचं या लोकांना फार काही वाटत नाही. आपल्याला शुद्ध पणाची एवढी हौस का असते काय माहित? रापचिक, ठासणे, अशक्य मजा येणे, उंडाव टाकणे, बळं बळंच, नाकात जाणे अशा आणि अशा कित्येक गोष्टी आणि साहजिकच अजून खंडीभर सेन्सॉर्ड गोष्टी....... खाली दिलेल्या प्रसंगांसाठी स्लँग सुचवा. अणी मला सांगा की ह्या स्लँगच्या मूड मधे तुम्हाला खाजऊ ची चिन्हं दिसतात का? खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण......

पहिला मुद्दा पिटातल्या पब्लिक सारखा आहे. तर दुसरा मुद्दा कॉफ़ी चहा टेबल चर्चेचा आहे......

तुम्हाला डिस्कोमधे भाव देत असलेली मुलगी अचानक समोर आलेल्या हिरोला खपली आणि तुम्हाला कटवलं

ट्रेन मधे किंवा मेट्रोमधे चढताना आजूबाजुच्या दोघातिघांनी तुम्हाला दिलो जानसे धक्काबुक्की केली..

मला शिकागो मधे बसून मराठी पांचटपणा ऐकायलाही खूप आवडेल

शुद्ध बैलोबा सुहृद