दिवसाचा पारा कसा
आकाशी चढला ।
धरणीचा जीव त्या
आगीने जळला ।
उजाड ते तरु आणि
उजाड तो माळ ।
पक्षी फिरे आभाळी
पाण्यासाठी व्याकुळला ।
रंग हिरवा दिसेना
स्पर्श ओलाही मिळेना ।
रात्र जाई दूरदूर
दिवसही लांबलेला ।
तेजोनीधी भास्कर तो
गगना मध्ये थांबलेला ।
रजनीचा नाथ त्याच्या
छायेमध्ये झाकोळला ।