स्वतःचसाठी...

अंगणातली
फुले म्हणाली-
"कुणीच नाही
येत बघाया,
कशास उमलू?"

"कौतुक नाही
कुणासही या
गंधाचे, मग
कशास उधळू?"

म्हटले त्यांना-
"फुलायचे
असते आपण ते
स्वतःचसाठी..."

"आनंदाने
जगायचे
असते आपण ते
स्वतःचसाठी!..."