रे अधिरा..

रे अधिरा, थांब जरा
सांजवात लावू दे
रेंगाळत संध्या ही
दूर तिला जाऊ दे

धसमुसळ्या, थांब जरा
बाळा निज येऊ दे
स्वप्नातिल परीसंगे
खेळ त्यास मांडू दे

भारीच तू हा असला
दीप तरी मालवू दे
थांब अरे...थांब अरे,
श्वास तरी घेऊ दे.

.......................................

कवि अनामिक (एक वाचलेली कविता)