मन

सगळ काही समजूनही

मन वेड्यासारखं वागतंय

नको त्याच गोष्टीचा

अट्टाहास करतंय

कितीही असलास जवळ

तरी दूरच तुला पाहतंय

कितीही केल्यास अपेक्षा पूर्ण

तरी उपेक्षाच मानतंय

काय करू ह्या वेड्या मनाला

प्रेमातलं हे भावी संकट वाटतंय