चारोळ्या - १

तुझा माझ्यावरील विश्वास
माझ्या जगण्याचा श्वास आहे
भरभरून मिळून सारं काही
तुझ्या एका हाकेची आस आहे

तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे
मी स्वत:ला खूप सावरलं होतं
मन तसं भिजून आलं होतं पण
अश्रूना मात्र मी आवरलं होतं

डोळे पाण्याने भरून आलेले आणि
मनात आठवणींचे आभाळ दाटलेले
झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या
थर टोकणार्‍या वेदनांचे साचलेले

किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले
किती ऋतू तसे पावसात चिंब झाले
कळले नाही मला कधीही ते सारं
माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले