बलुतं

दया पवार यांच्या बलुत या कादंबरीवर आधारित-

बलुतं

सागरातल्या हिमखंडाला हळूच बाहेर काढत गेलो
लिहायवला बरेच होते तरी गाळून थोडे लिहित गेलो
उरावे मागे काही तशा चालून आल्या ज्वाला वरती
त्यांना हिमनग समजत गेलो, दाह त्यांचा साहत गेलो

सोलत जावे कातड्यास या, तसे आठवण चाळत गेलो
वेशीपलिकडच्या वस्तीमध्ये अलगद  मी झिरपत गेलो
भाकरीसाठी अपमान  माझे, वर्तूळाची साक्ष त्यांची
कशास झाली अक्षरओळख त्याचा खेद पचवित गेलो.....

 बोलावयाचे बोलून झाले, ऐकणारे चार ऐकून गेले
माणसाच्या माणुसकीला जंगलात मी शोधत गेलो
टीकाप्रहार त्यांचे सारे ;मान सन्मान  होते माझे!
दुखावलेल्या मनांस मी किती आणखी बोचत गेलो!

माझ्या चुकीचा कबुलीजबाब मी स्वच्छ देत गेलो
येशूने क्रॉसाने झुकावे तसे मीही वाकत गेलो
सवर्णात जाण्याकरता आयुष्यभर झगडून उरलो...
आसवांत माझ्या किरणे मी कधी माळत गेलो