शब्दकोडे

अपूर्णतेच्या अंधारात
पूर्णत्वाचे विवर
अर्थकाहुर शब्दभांडारात
विषण्णतेचे प्रहर
पद्यपंक्तिंच्या मांडवात
शब्दफुलांची झगमग
दुर्बोध रचनांच्या जाळ्यात
भाबड्या जीवांची तगमग
सुबोध, सुस्पष्ट विचारांचे
अर्थवेत्त्यांना का वावडे
तिमिरघन मायाजालात
रसिकांना शब्दकोडे