ती

ती नसता तिचे गाणे

एकटे एकटे

तिचे नक्षत्र अपूर्ण

साजरे साजरे.

तिच्या डोळ्यातला स्पर्श

गहिरा गहिरा

अनावर ह्रदयाचा ठाव

सोयरा सोयरा.

शब्दरहित तिची माया

ओलेती ओलेती

अंग भरुन तिची सावली

बावरी बावरी.

शोधता सापडेना ती

हरिणी हरिणी

तिचे रानातले गूज

अबोली अबोली.

मज ठावे तिचे गुपित

भिजलेले श्वास

किती रोखले तरीही

जातो सांगून पाऊस.