कशी असावी माझी प्रिया...

ओठावर किंचित हसू, अन गालावरती खळी...

शोभतसे ती चंद्रकोर, रुंद तिच्या भाळी...

मूखकमळ ते उमलूनी यावे सोनेरी सकाळी

लखलखावी तेजोमय कांती रम्य सांजवेळी

      

वेणीतुनी निसटून यावी, हलकेच एक बट,

नजरेच्या त्या किरणांनी, खुलावा मनाचा पाट

"किस्मत ने साथ दिया तो" .. होईल माझीही भेट

आम्ही दोघे राजा-राणी, रम्य नदीचा काठ

     

ते नवयौवन ते सुखलोचन, सदैव करतो तिचेच चिंतन

निशाचरापरी रात्र काढतो, आठवणीने व्याकुळ होऊन

रोज पाहतो स्वप्न सुखाचे, प्रचंड आशा उरी बाळगून

सांग सखे तू प्रसन्न होशील का ह्या आहुतीतून ?

       

तरुणांच्या ओठातील ओळी , लेखणितुनि अवतरल्या...

तयामधला मी ही एक, म्हणुनी मला ह्या आठवल्या..

स्वप्नामधल्या ललना, ज्या तुजला आवडल्या..

नियतीचाही खेळ निराळा, त्या केव्हाच्या खपल्या...

                                                              मर्द मराठा