शासकीय जन्मतारखेच्या निमित्ताने

आज १ जून. शासनाच्या धोरणानुसार ज्यांची जन्मतारीख उपलब्ध नाही अशा सर्वांची जन्मतारीख १ जून धरली जाते. त्या अर्थाने आज कित्येकांचा वाढदिवस असेल. काही मनोगतीही त्यांत असतील. अशा सर्वांचेच मन:पूर्वक अभिनंदन.

या निमित्ताने काही प्रश्न:

१. एक जून हाच दिवस का निवडला गेला असावा? ( माझ्यामते शाळा सुरू होण्याचा तो महिना असल्याने नव्यानेच शाळेत नाव घालताना त्या महिन्याची पहिली तारीख म्हणून हा दिवस धरला गेला असावा. )

२. अन्य देशांत अशी प्रथा आहे का?

३. या प्रथेची सुरूवात नेमकी कधी व कोठे झाली?

४. जन्म तारीख नेमकेपणाने शोधून काढण्याचे वैद्यकीय तंत्रज्ञान अस्तित्वात आहे का? (माझ्या वाचनात आल्या प्रमाणे हाडांच्या/ दातांच्या तपासणीतून वयाचा अंदाज घेता येतो. मात्र जन्मतारीख नेमकेपणाने समजू शकते काय? )

या प्रश्नांची उत्तरे मिळावीत, अशी अपेक्षा.

पुन्हा एकदा सर्वच संबंधितांचे अभिनंदन.