अनोखा परिचय ऋग्वेदाचा

अमेरीकेच्या वास्तव्यात एक अनोखे पुस्तक वाचनात आले. काहीसे अनोखे नाव असलेल्या या पुस्तकाचे नावच आहे   'अनोखा परीचय ऋग्वेदाचा '

पुस्तकाचे लेखक श्री. रघुनाथ दत्तात्रेय जोशी, हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजीनिअर. वडीलांचा व्यवसाय भिक्षुकी. वयाच्या १३ /१४ वर्षीच ऋग्वेदातील ९०० ऋचा वडीलानी बाल रघूनाथाकडून पाठ करून घेतल्या. कारण, व्यवसायाचा वारसा त्याना आपल्या मुलग्याकडे द्यावयाचा होता. पण विधीलिखित काही निराळेच होते. रघूनाथराव इलेक्ट्रिकल इंजीनियर झाले आणि नोकरी करत असताना, संस्कृत पंडीतही झाले. १० वर्षे ऋग्वेदाचा अभ्यास करून, २००४ साली वयाच्या ७९ व्या वर्षी 'अनोखा परीचय ऋग्वेदाचा ' हे नि;संषय अनोखे वाचनीय, प्रत्येकाच्या संग्रही असावे असे एक पुस्तक लिहिले. त्यांच्या पत्नी सौ. वसुधा रघूनाथ यानीच ते पुस्तक प्रकाशीत केले.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत श्री. जोशी लिहीतात, " मी ऋग्वेदाचा  जसा परीचय करून दिला आहे तसा अजून कोणीही करून दोला नसेल.  पुस्तक लिहीण्याच्या अगोदर केलेल्या अभ्यासाविषयी श्री. जोशी लिहीतात, " संपूर्ण ऋग्वेदभाषांतर वाचून त्यातून वेगवेगळ्या शीर्षकांवर टीपा, मुद्दे, शक्यतो प्रत्येक पदाचा अर्थ वगैरे लिहीत जाऊन भाषांतरग्रंथ पूर्ण करावयास १० वर्षे लागली.वह्यांची ३०० पृष्टे नोंदीनी भरली.एक लाख पंचवीस हजार पदांचे योग्य वाटलेले अर्थ लिहीले व मग या पुस्तकाची साधारण रूपरेषा ठरवून ते लिहावयास प्रवृत्त झालो. '

पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुण्याचे प्रा. धडफळे लिहीतात. ' लेखकाकडे विनय आहे, वाचन आहे. ग्रंथविषय हा आम्हा हिंदूंचा धर्मग्रंथ असला तरी त्याची अर्थनिर्धारणा करताना,अर्थ करावा का इथपासून ते ग्रंथातील विसंगती इथपर्यन्त सर्व तपासून घेण्याची भूमिका आहे " पुस्तकाच्या ३ पानावर प्रा. लिहीतात. "ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा ऋग्वेदसारग्रंथ वाचकांच्या हातात पडणार. त्याच्या वाचनाने तोटा तर नाहीचपण नफाच नफा पदरी पडणार आहे.

२१६ पानांचे हे पुस्तक फक्त ६० रु. मिळू शकेल. श्री. जोशीनी २००६ साली लिहीलेले " उपनिषदातील ब्रम्हघोटाळा ( द्वितीय आवृत्ती ) हेही एक अनोखे पुस्तक वाचनीय, संग्रीह आहे. किंमत रु. ५०. पुस्तके हवी असल्यास खालील क्रमांकावर विचारावे.

शरयु--------------०२२ २४३००८१७ दादर, मुंबै.  अरविंद-----------०२० २४२२५६०० पुणे.

वसूधा------------०२३५६ २६३९५५. खेड जि. रत्नागिरी.

गुरुजी