पोलंडमधील वटपौर्णिमा

गाडीच्या धक्क्याने एक कामगार मरणप्राय अवस्थेत (कोमा) गेला. शिवाय त्यात त्याला कॅन्सर झाला. डॉक्टरांनी तो मरणार असे सांगितले तरी त्याच्या बायकोला तो सुधारेल असे वाटले होते त्यामुळे तिने तिची काळजी घेतली.

एक नव्हे दोन नव्हे तरएकोणीस वर्ष!

दरम्यान पोलंडमधली कम्युनिस्ट राजवट बदलून लोकशाही आली.

शेवटी तो मनुष्य शुद्धीवर आला. आता आणखी सुधारेल.

वटसावित्रीची गोष्टही अशीच आहे नाही का? तिथेही सत्यवान आपले काम करत असतानाच मरतो इथेही कामगाराला  कामाच्या ठिकाणीच अपघात झाला. तिथे यमाने प्राण परत करायला नकार दिला. येथे डॉक्टरांनी तो मरणार असे सांगितले. तिथे सावित्रीनेपातिव्रत्याच्या साहाययाने सत्यवानाला यमाच्या तावडीतून सोडवले. इथे बायकोने एकोणीस वर्ष्हे काळजी घेतली.

विशेष म्ह्णजे पोलंड मधली ही घटनाही वटपौर्णिमेच्या सुमारासच झाली.

बातमी इथे आहे. - पोलंडमधली घटना