अशी रंगले तुझ्या रंगी रे
निळीभोर मी सजण घननिळ्या
दिसते मजला जिथे तिथे रे
छबी तुझी रे का चितचोरा
कोण तुझी मी सांग माधवा
पुरे अता हा खेळ दंगला
कुब्जा मिरा भामा रुख्मी
थकल्या साऱ्या शोधुनि मजला
तनी मनी मी लपले तुझिया
कृष्णसख्या मी तुझिच राधा...........
शीला.