साथ तुझी......

दिस उगवतो माझा

सख्या तुझ्या सादेलागी

रात थबकते तुझ्या

अलवार चाहुलीशी.....

संध्या निशिगंधा होई

राती रातराणी फ़ुले

अंगी मोगऱ्याची धुंदी

मनी चाफ़ेकळी झुले......

डोळे खट्याळ मागती

काय देऊ नजराणे

गंध-भारली ही तृप्ती

ओठी मुग्ध हे तराणे.......

शीला.