मना मधे एक वसली,श्वासांमधे तिच घडली,
रात्र स्वप्नांनी तिच्याच होते ओढीने होतो दिनारंभ.....
मृदु शीतल स्पर्श तिचा, निसर्ग प्रथम प्रहरीचा जसा,
गौर वर्ण सुंदर तिचा, शेतामधला कापुस जसा.......
डोळ्यात तिच्या विश्वास मोठा,भुतलावरचा सागर जसा,
केसांमधे छटा अशी, फुलांसाठी रंग जशी.........
मोहक आकर्षक नयन सुखावणारी ती....
मनास हवी हवीशी ओढाळ गाय ती.......
जमेल का माझे सुत तिच्याशी?...
कारण ...
मना मधे हिच वसली,श्वासांमधे हिच घडली,
रात्र स्वप्नांनी हिच्याच होते ओढीने हिच्याच होतो दिनारंभ..... अमित भेलोंडे