पोह्याचे गरम गरम वडे

  • पातळ पोहे १ पाव
  • १-१/२ वाटी बेसन
  • बारीक चिरलेला कांदा १ वाटी
  • आले,लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट
  • तळण्यासाठी तेल
  • हळद,तिख़ट,जिरे पावडर आणि मीठ (आपल्या चविनुसार)
  • बारीक चिरलेली कोथिंबिर
१५ मिनिटे
३-४ जणांसाठी

पातळ पोहे थोड्या पाण्यमध्ये ५ मिनिटे भिजत घालणे.त्यानंतर एका पातेल्यात भिजलेले पोहे,बेसन,बारिक चिरलेला कांदा,बारीक चिरलेली कोथिंबिर,आले,लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट,हळद,तिख़ट,जिरे पावडर आणि मीठ घालणे.कढईत तेल गरम करण्यास ठेवणे.थोडे गरम तेल वरील साहित्यात टाकणे व हे सर्व व्यवस्थित एकत्र करणे.आवश्यकतेनुसार पाणी घालून वडे थापून तळता येतील इतपत भिजवणे.त्यानंतर चपटे वडे हातावर थापून लालसर होइस्तोवर तळणे.

हे वडे गरम गरमच छान लागतात.सॉस किंवा दह्याच्या चटणी बरोबर खाणे.

आई