'अन् गजल जुळे' - गज़लसंग्रह प्रकाशन

कार्यक्रम:

'अनघा प्रकाशन, ठाणे' यांच्या ४२ पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते २१ जून २००७ रोजी दुपारी ३ वाजता मंत्रालयातील समिती सभागृहात आयोजन करण्यात आलेला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री मधुमंगेश कर्णिक (अध्यक्ष - साहित्य संस्कृती मंडळ), अरुण साधू (अध्यक्ष - अखिल भारतीय साहित्य संमेलन), भारतकुमार राऊत (संपादक - महाराष्ट्र टाइम्स) हे उपस्थित राहणार आहेत. अजब (डॉ. आश्विन जावडेकर) आणि कुमार जावडेकर या जुळ्या बंधूंनी लिहिलेल्या 'अन् गजल जुळे' या गझल संग्रहाचा या पुस्तकांमधे समावेश आहे. या पुस्तकाची प्रस्तावना पं.यशवंत देव यांची आहे.

प्रवेश: निमंत्रितांसाठी.

'मनोगत' आणि 'मनोगतीं'चा या पुस्तकाच्या जडण-घडणीत मोठा सहभाग आहे. इथे लिहिता-लिहिता आम्ही खूप शिकलो (अजूनही शिकतो आहोत), हे आवर्जून सांगावंसं वाटतं. श्री. वेलणकर आणि सर्व मनोगतींना मन:पूर्वक धन्यवाद!

- (मनोगती) अजब आणि कुमार जावडेकर