फोडणीचा भात

  • शिळा भात २ वाट्या, ४ चमचे डाळ्याची भरड, २-३ लसण्याच्या पाकळ्या.
  • २ सुक्या लाल मिरच्या, ३ चमचे तेल, फोडणीचे साहित्य,हळद, मीठ चवीनुसार,
  • कोथिंबीर १ चमचा लिंबाचा रस
१५ मिनिटे
२ जणांना

प्रथम गॅसवर कढई तापत ठेवावी .  कढई तापल्यावर त्यात तेल मोहरी जिरे हळद घालून फोडणी करावी.त्यात लसूण घाला. लसूण खमंग तळल्या गेला की त्यात लाल मिरच्या, भात, डाळ्याची भरड, मीठ घालून चांगला परतून घ्या. एका वाढायच्या भांड्यात काढून त्यावर लिंबाचा रस घाला व कोथिंबिरीने सुशोभित करा.

हा भात भरडाभातासारखा लागतो.

स्वप्रयोग