नारायणगांव

.
"नाऱ्यांगाव"
.
"ना रा य ण गां व" असं लांबचक म्हणायच्यापेक्षा "नाऱ्यांगाव" किंवा त्यातहि सुधारित आव्रुत्ति म्हणजे "नारांगाव"
.
आठवडी बाजारालायेणाऱ्या साऱ्या जुन्नरिंच्या तोंडवळनी पडलेलं. त्याचा प्रत्यय दर शनिवारि चांगलाच येतो.
.
पुण्यात नव्यानेच आलेला एकजण दत्त दर्शनासाठि आपल्या बाईक वर चक्क ८० किलोमीटरचा प्रवास करुन या नाऱ्यांगावला आला तेव्हा त्या बेट्याला "नारायणपुर" आणि "नाऱ्यांगाव" हयातला फरक काय तो आयुष्यभरासाठि कळला. "निरा प्यायची ईच्छा आन चुकुन ताडिच्या दुकानात घुसल्यासारखी ससेहोलपट झाली" अशी भावना त्या सभ्य म्हणवुन घेणार्या माणसाची?
.
आता नारायणगड जवळ आहे म्हणुन "नारायणगाव" असा माझा समज आहे, पण त्याहिपेक्षा "गणपीर" डोंगर जास्त जवळ असताना "नारायणगड"च का? हे मला अजुनही न सुटलेल कोड आहे.
.
गावाला वेढा देवुन जाणारी मीना नदि म्हण्जे "घाण" वाहुन नेण्यासाठि व लोकांनी "घाण" करण्यासाठि आहे ह्याचा प्रत्यय नदिच्या कडेने हिंडल्यानंतरच येतो. प्रत्येक गावाला गावकुशीचा रस्ता असतो ज्याला सुशिक्षित "बायपास" व गावकरी "गोखाडिचा रस्ता" म्हणतात तो नारांगावात नेमका कुठे आहे ह्याचा मात्र गोंधळ आहे.

पुणे-नासिक हायवेवर असण्याचा बिनचुक फायदा उचलत हया गावाने तालुक्याच्या गावावरहि मात केलि. अगदि कानामागुन येवुन तिखट झालयाप्रमाणे, (तशी इथली मिसळहि तिखटच असते बरका) पण.....
.
... . वर्षानुवर्षे अगदि रंगरुपानं काडीमात्रहि न बदलले इथलं एस.टि स्टॅडं म्हण्जे मात्र करमणुकिचाच विषय. त्यातल्या "शेवंता थिएटर्स" च्या बोर्डवर कुठलंया पिक्चरचं (कि हिरोईनच) पोस्टर लागलय ह्यावर पोरांची विषेश नजर. (मुंलिबद्दल आपल्या काय माहित नाहि बुवा) शेजारच्या लिंबाच्या जुनाट झाडांखाली लक्ष्मीनारायण, अलंकार क्लाथ सेंटर किंवा प्रकाशचे माक्याचे तेल असले कसले तरी बोर्ड हमखास लागलेले असतातच, त्यांच्या खालि सावलिपाहुन बसायला जावं तर वर टपुनच बसलेल्या कावळ्यानं त्याचा प्रसाद दिलाच. . . सगळं काही जसंच्या तस्सच!!!! . . . ह्या सगळ्यांची त्यांच्यात्यांच्यातच विचित्र "मॅच्युअल डिपेंडंसी" असावी (नव्हे तर आहेच) अशी माझी खात्रीच आहे.
.
उन्हाळ्यातिल खास आकर्षण म्हण्जे तमाशाच्या राव्हट्या. . . मंगला, रघुवीर(लोक याला रघ्या म्हण्त्यात), पांडुरंग मुळे, भिका-भिमा,तांबे, महाडिक,ढवळपुरिकर, आररर र नुसत्या ४०-५० एका चढ एक बाऱ्या.
.
ह्या रघ्याच्या तमाशात अमुक अमुक नाचनारि आहे ना ती गेल्या वर्षि नित्या बनसोडेच्या फडात "मुंगळा-मुंगळा" या गाण्यावर धिंगाना करायचि. इतपर्यंत इंत्यंभुत माहिति असणारेही अनेक नगहि नारांगावातच सापडतिल. फडासाठि, लोककलेसाठि उभं आयुष्य कष्ट उपसणाऱ्या "विठाबाई भाउ मांग" हिला "नारायणंगावकर" असं उपपद अदरानं बहाल करणारि तमाशापंढरीहि हिच.
.
.
सचिन, नारायणंगाव २१/६/०७