चॉकलेट केक

  • १ कप मैदा, ३/४ कप साखर, १/२ दही, १/२ घट्ट साय, १ छोटा
  • चमचा बेकिंग पावडर, १/२ छोटा चमचा खायचा सोडा, ५ चमचे दूध,
  • २ मोठे चमचे कोको पावडर
१ तास

मैदा, कोको पावडर, सोडा व बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. एका भांड्यात दही, साय आणि साखर  हलकं होईपर्यंत फेटून घ्या. त्यात चाळलेला मैदा  थोडा थोडा टाका व दूध टाकून फेटा (हा हा हा) . फार फेटू नये. एका भट्टीत ठेवायच्या भांड्याला तूप लावून हे मिश्रण ओता. १८० डिग्री तापमानावर ३०-३५ भाजा. १० मिनिट केक बाहेर काढू नये.

केक छानच लागतो. केकवर आईस्क्रीम व चॉकलेट सॉस टाकून छानसं डेझेर्ट करता येतं.

आठवत नाही.