विचार

मनातील विचार मनातच राहतात

आणि वादळं निर्माण करतात

पण जर बाहेर पडले तर

मन हलके करतात.

त्या विचारांना हे कोणी शिकवलं

वादळं केव्हा निर्माण करायची

की मन हलकं करायचं,

देवच असतो कर्ता सवर्ता

तोच जग सांभाळतो

विचारांना मात्र तो

लगाम घालु शकत असेल काय?