आयुष्य तेच आहे

आयुष्य तेच आहे
रोग जुनेच आहेत
उपचार घेतो त्याला
नाव नवेच आहे

आयुष्य तेच आहे
मधूर गाणे आहे
निसर्ग छेडी संगीत
लयबद्ध होणे आहे

आयुष्य तेच आहे
माणसांचे मळेच आहे
एखादं दुसरा सजीव
बाकी निर्जीव पुतळेच आहे

आयुष्य तेच आहे
तुझे माझेच आहे
करता करता शेवटी
वाहतो ओझेच आहे

आयुष्य तेच आहे
सांगतात सारेच आहे
एक सारखं वाटतं नाही
आयुष्य कुठेच आहे

आयुष्य तेच आहे
अधांतरी वाटेचं आहे
मृत्यूच एक सत्य
बाकी खोटेचं आहे

आयुष्य तेच आहे
गाणे सुरेख आहे
कोणी सुखाचे, कोणी दु:खाचे
गातो हरेक आहे

आयुष्य तेच आहे
सौंदर्यांवर भाळलेच आहे
मी मागितला चंद्र
हात पोळलेच आहे

आयुष्य तेच आहे
शहाणे खुळेच आहेत
शहाण्यांची ओळख
वेड्यां मुळेच आहे

आयुष्य तेच आहे
प्रश्न वाकडेच आहे
मनाला जे पटतं
मेंदूसाठी कोडेच आहे

आयुष्य तेच आहे
हलके फुलकेच आहे
आठवणी राहील्या मागे
समाधान इतुकेच आहे

आयुष्य तेच आहे
भोगणं इथेच आहे
किती कुरवाळशी सुखांना
दु:ख मागेच आहे

आयुष्य तेच आहे
जाणे लगेच आहे
किती जपशी जिवास
वितळणे आलेच आहे

@सनिल पांगे