जायचयं तुला तर जा ,
आता मला त्याच
काहीच वाटणार नाही
प्रेम प्रेम बस झाले ,
आता माझे तुझ्यावाचुन अडणार नाही
तु होतीस सर्वस्व माझे ,
पण आता कोणीच उरलं नाही
मागे ठेवुन जाईल असं
वाली कुणी उरलं नाही
लाख जखमा दिल्यास तु,
तरी मी हरलो नाही
जीत असो वा हार,
फ़क्त लढलो पण कधी पडलो नाही
असेल झाला विजय तुझा ,
पण मी धीर सोडला नाही
मी आहे लढवय्या ,
कणा माझा मोडला नाही.
होतो मे आशिक,
होतो मे दुबळा,
आता तो अशिक
परत तुला भेटणार नाही.
आता फ़क्त मी 'एक मावळा',
मागे कधीच हटणार नाही
************एक मावळा************