जगण्याचे बहाणे खुप आहेत पण
आता तुला पाहुनच जगतोय
आता मैफ़ीलीत जाणं सोडलय
तुझ्या डोळ्यांनीच आता मी पितोय
प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवलेला
एखाद्या स्वप्नासारखा जाणवतोय
प्रत्येक थेंब डोळ्यातला
तुझ्या आठवणीने ओघळ्तोय
सगळ्यांशी बोलणं सोडलय आता
फ़क्त तुझ्या मनाशी बोलतोय
आता मैफ़ीलीत जाणं सोडलय
तुझ्या डोळ्यांनीच आता मी पितोय
समोर तु असल्यावर
तुझ्याशिवाय दुसरं
काहीच दिसत नाही
दिवसभर तुला पाहील्यावरही
मन माझं भरत नाही
बाकी कोणाला सांगितलेलं
नाही फ़क्त तुलाच सांगतोय
आता मैफ़ीलीत जाणं सोडलय
तुझ्या डोळ्यांनीच आता मी पितोय.....तुझ्या डोळ्यांनीच आता मी पितोय.....
@सचिन काकडे [जुन ०३, २००७]